जीवन तरंग

जीवनदर्शन

🌊 जीवन म्हणजे नदीप्रमाणे प्रवाही

"जीवन हे नदीप्रमाणे प्रवाही असतं, म्हणूनच पाण्यालाही जीवन म्हणत असावेत. जीवन इतके सुंदर आहे की, अनुभव जसे येतील त्याप्रमाणे प्रयत्न करत राहणं हे अवलंबलं की, मार्ग निश्चित सापडतो."

🧵 वीण – राजवस्त्राची उपमा

आठवणी म्हणजे विविध रंगांचे धागे. काही आनंदाचे, काही दुःखाचे. त्यांना गुंफताना एक राजवस्त्र तयार होते.

🙏 कृतज्ञता – देवालयातील स्नेही

"मनुष्यजन्म साकारताना आयुष्याकडे मंदिर म्हणून पाहिलं तर भेटणारे, दिलासा देणारे स्नेही देवच वाटू लागतात..."

📜 कवी मंगेश पाडगावकर यांचे अभिवचन

"या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे."

✨ आत्मचरित्र फक्त असामान्यांसाठी नाही

"प्रत्येकानी आपल्या आठवणींचा पेटारा उघडून बघावा आणि आपल्या मनाची बॅटरी चार्ज करावी असा एक नवीन पायंडा पाडण्याचा मी प्रयत्न केला आहे."

या पुस्तकातून सर्वच लहानथोर मंडळींना बोध घेता येईल असा विश्वास आहे.