जीवन तरंग

📖 जीवन तरंग

आत्मचरित्र – आठवणींचे राजवस्त्र

"जीवन प्रवासातल्या आठवणी.. जणू काही मी विणायला घेतल्या. प्रश्न पडला, 'कोणते धागे घ्यायचे?' एक-दोनच की सगळेच वापरायचे ?

म्हटलं एक काय, दोन काय.. वेचकच घेऊ. आधी विणू तर खरं. उमलली स्मृतींची हळवी फुले. एक धागा आशेचा, सुखाचा आनंदाचा.. दुसरा निराशेचा, दुःखाचा, अपयशाचा. सरळ, वाकडे, उभे, आडवे, तिरपे, बहुढंगी... सफेद, काळे, निळे, पिवळे, बहुरंगी. सगळेच कसे छान, सुंदर, प्रसन्न होते.. सगळेच माझ्याशी प्रेमांनी बोलत होते.

विणत गेलो तनमनाने, उल्हासाने.. गुंफण केली नाजूक तशी हळुवारपणे. धागे धाग्यात आपसूकच गुंफत गेले.. लक्षात आलं, वस्त्र आता आकारू लागलेलं... तरीही अजून काहीतरी बाकी राहिलेलं.

या विणकरीच्या आधाराने प्रारंभी लहान चौकड्या विणल्या जाऊन नंतर एक वस्त्र तयार होतं. मी माझ्या विणकामावर नजर टाकली तर 'राजवस्त्र' तयार झाले की गोधडी – हे मी सांगणं उचित नाही. मात्र रसिक वाचक निश्चितच त्याची पारख करतील. मी गुंफलेल्या या माळेतील अक्षरं माझ्या अंतकरणाच्या अंतःकोषाला स्पर्श करून जन्माला आली आहेत."

पुस्तकाविषयी

कोरोनाच्या बंदीवासात (मार्च २०२० पासून) मी आठवणींना उजाळा देण्याचा हा प्रयत्न केला. आतापर्यंत पैशांचा हिशोब केला, आता आठवणींचा हिशोब जुळवला. हे पुस्तक म्हणजे फक्त ज्येष्ठांसाठी नव्हे, तर युवा पिढीला दिशा देणारे आहे. प्रत्येकाने आपल्या आठवणींचा पेटारा उघडून मनाची बॅटरी चार्ज करावी, असा हा नवा पायंडा आहे.

प्रकाशन: प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या हस्ते.

पुस्तक प्रकाशन व्हिडिओ पाहा →